सप्रेम नमस्कार,
आपल्या चंपावती ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या ...रेवदंडा संस्थेचे सन २०२१-२०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष होते.
आपल्या संस्थेची सन १९९६ साली चौल - रेवदंडा परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक दिवंगत डॉ. श्री .अच्युत महादेव ओक यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली श्री.अरविंद दत्तात्रेय मनोहर व श्री.दिलीप जसभाई पटेल मुख्य प्रवर्तक व अन्य सहकारी यांच्या प्रयत्नाने दि.०१ मे १९९६ रोजी चंपावती ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या ...रेवदंडा पतसंस्थेची स्थापना झाली.पतसंस्थेचे संकल्प उदघाटक मा.श्री.सतीशजी मराठे हे होते.पतसंस्था स्थापण्यासाठी कमळ नागरी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मा.श्री.गिरीशजी तुळपुळे आणि प्रा.डॉ . उदय जोशी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डॉ.ओक यांच्या स्वतः च्या मालकीच्या इमारतीत संस्थेचे कार्यालय सुरु करण्यात आले.संस्थेचे त्यावेळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अरविंद द. मनोहर, उपाध्यक्ष श्री.दिलीप ज . पटेल व सचिव श्री. रमेश गो.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरु झाले. आपल्या संस्थेच्या रेवदंडा मुख्य शाखा व चणेरा शाखा अशा दोन शाखा कार्यरत आहेत.
आपल्या संस्थेच्या अंतर्गत व बाह्य सुशोभित सुंदर वास्तूचे उद्घाटन १३ जानेवारी २००१ रोजी मा.खासदार श्री.वेदप्रकाशजी गोयल यांच्या शुभहस्ते आणि ख्यातनाम अभिनेते श्री. विनय आपटे व मा.श्री .सतीशजी मराठे यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याने संपन्न झाले.संस्थेच्या रेवदंडा व चणेरा अशा २ शाखा असून त्या स्वमालकीच्या जागेत संपूर्ण संगणकीकृत आहेत.
इवलेसे रोप लावियले दारी,त्याचा वेलू गेला गगनावरी.... या उक्तीप्रमाणे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास व जिव्हाळा यावर आपली संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.सदर वाटचाल करताना एकदम उत्तुंग भरारी न मारता पायरी पायरीने यशाच्या शिखराकडे जात आहे. संस्थेची जनमानसातील प्रतिमा टिकवून ठेवणेसाठी संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने उपयुक्त बदल असतील ते स्विकारुन पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे.आतापर्यंत संस्था आदर्श कशी राहील याकडे लक्ष दिले गेले परंतु इथून पुढे संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ कशी होईल याकडे कटाक्षतेने लक्ष दिले जाईल. संस्थेच्या सभासदांसाठी संस्थेला कोणकोणत्या गोष्टी करता येतील याचा विचार कायम मनात आहे.
मला आपल्याला सूचित करण्यास आनंद होत आहे की, आपल्या संस्थेच्या २ शाखा कार्यरत होत्या परंतु सन २०२१ पासून संस्थेचे मुख्य कार्यालय(रेवदंडा ) व रेवदंडा शाखा, चणेरा शाखा अशा एकूण ३ शाखा झालेल्या आहेत. आपल्या संस्थेने कोअर बँकिंग सोल्युशन (CBS ) सिस्टीम चालु केलेली आहे. त्यामुळे शाखा ते शाखा व्यवहार करणे खातेदारास सोपे झालेले आहे. या व्यतिरिक्त संस्थेच्या सभासदांना त्यांच्या बचत खात्यामधून RTGS व NEFT करण्याची सुविधा चालु केलेली आहे. त्यामुळे सभासदाला संस्थेमध्ये असलेल्या त्याच्या बचत खात्यातील रक्कम भारतातील दुसऱ्या कोणत्या ही बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करणे सोपे झालेले आहे. या बरोबरच संस्थेच्या सभासदांना घर बसल्या किंवा प्रत्यक्ष शाखेत न येता असेल तिथून व्यवहार करण्यासाठी सभासदांकरता मोबाईल बँकिंग (Mobile Banking ) ची सुविधा चालु केलेली आहे.हे मोबाईल ॲप्लिकेशन खातेदारच्या बचत खात्याशी संलग्न असते. याद्वारे रु.३०,०००/-पर्यंन्त (NEFT) फंडस् ट्रान्सफर ची सुविधा संस्थच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.लवकरच सदर सेवा २४×७ चालु करण्याच्या प्रयत्नांत आहोत.या व्यतिरिक्त संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे विविध प्रकारची बिलं भरण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच स्वतःचे बचत खात्याचा बॅलंन्स तसेच अकाऊंट स्टेटमेंट घरबसल्या चेक करता येऊ शकते.
संस्थेचा सभासद हा संस्थेचा मालक आहे.त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी व सभासद समाधानी राहण्यासाठी ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या करण्यासाठीच्या नवीन योजना दरवर्षी संस्था राबवित आहे.व यापुढेही त्या राबविल्या जातील. संस्था सामाजिक,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यास प्रोत्साहन देत असते.संस्थेतर्फे दरवर्षी रेवदंडा,नागाव व चणेरा येथील विद्यालयातून इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे देऊन सत्कार केला जातो.तसेच ग्राहक मेळावे,हळदी-कुंकू समारंभ इ .. कार्यक्रम संस्था करीत असते.
संस्थेस खालील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
संस्थेच्या कामाची धुरा वाहणारे यापूर्वीचे व विद्यमान संचालक मंडळ संघकार्याने प्रेरीत होऊन संस्थेशी जोडले गेलेले आहेत.त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे संस्थेची भरभराट झाली आहे.श्री.अरविंद द. मनोहर,श्री .दिलीप ज . पटेल,श्री.हेमंत मु .दांडेकर,कै.रमेश गो. जोशी विद्यमान अध्यक्ष श्री.विश्वास विनायक जोशी यांनी अध्यक्ष पदावर काम करताना शिस्तबद्ध व जबाबदारीचे भान ठेवून संस्था जनमानसात पोहोचवली आहे.संस्थेच्या प्रगतीच्या कार्यात विद्यमान संचालक श्री.प्रसाद श.आठवले, श्री.उल्हास का. तुरकर श्री.पांडुरंग वि.मोहिते(बाबा मोहिते),श्री.अरविंद द.मनोहर,श्री.दिलीप ज.पटेल, श्री.विलास ल. धाटावकर,श्री.अभय द.मोडक,श्री.संजय अ.ठाकुर सौ.शामल ग. पराड,सौ.स्नेहा सं.जोशी,श्रीमती.बिना भा.पटेल तसेच,तज्ञसंचालक डॉ.श्री.केदार अ.ओक व माजी तज्ञसंचालिका सौ.माधुरी प्र.नाईक तसेच दिवंगत सदस्य कै.श्रीधर मो.पाटील,कै.निला श्री.प्रथम,कै.प्रकाश ल.म्हात्रे,कै.मदन ज.कंटक,कै.विनय ह.वैद्य,यांच्या कामांची सातत्याने जाणीव होत आहे. श्री . प्रभाकर ध.नाईक,श्री.राजेंद्र हं.जैन,सौ.संतोषी ना.शर्मा,श्री.महेंद्र द.घरत,सौ.अनिता हे. दांडेकर,श्री.कृष्णकुमार हे.वर्मा यांनी संचालक मंडळावर काम करून संस्थेच्या कार्यात हातभार लावला आहे. संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत पूर्ण करतो.