आपल्या संस्थेची सन १९९६ साली चौल - रेवदंडा परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक दिवंगत डॉ. श्री .अच्युत महादेव ओक यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली श्री.अरविंद दत्तात्रेय मनोहर व श्री.दिलीप जसभाई पटेल मुख्य प्रवर्तक व अन्य सहकारी यांच्या प्रयत्नाने दि.०१ मे १९९६ रोजी चंपावती ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या ...रेवदंडा पतसंस्थेची स्थापना झाली.पतसंस्थेचे संकल्प उदघाटक मा.श्री.सतीशजी मराठे हे होते.पतसंस्था स्थापण्यासाठी कमळ नागरी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मा.श्री.गिरीशजी तुळपुळे आणि प्रा.डॉ . उदय जोशी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डॉ.ओक यांच्या स्वतः च्या मालकीच्या इमारतीत संस्थेचे कार्यालय सुरु करण्यात आले.संस्थेचे त्यावेळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अरविंद द. मनोहर, उपाध्यक्ष श्री.दिलीप ज . पटेल व सचिव श्री. रमेश गो.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरु झाले. आपल्या संस्थेच्या रेवदंडा मुख्य शाखा व चणेरा शाखा अशा दोन शाखा कार्यरत आहेत.
सदस्यांना पारदर्शक व सुरक्षित आर्थिक सेवा प्रदान करणे.
सर्वांसाठी आर्थिक सशक्तीकरण व स्थैर्य निर्माण करणे.
किफायतशीर कर्ज, आर्थिक साक्षरता, व पारदर्शक व्यवस्थापनाद्वारे सदस्यांच्या विकासाला हातभार लावणे.